कडक लॉकडाऊनमध्ये देहविक्री सुरू ; एका युवतीसह दोन जणांना अटक


बुलडाणा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेगाव येथील एका लॉजवर देहविक्री सुरू असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर, आनंद सागर जवळील अंबर लॉजवर धाड टाकत पोलिसांनी सोमवारी रात्री कोलकात्याच्या एका युवतीला अटक केली आहे. याबरोबरच अंबर लॉजचा मॅनेजर आणि एक ग्राहक ही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, नागपूर येथील एका दलालाकडून कोलकात्याच्या युवतीला शेगाव येथे पाठवण्यात आल्याची पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली तसेच गेल्या ५ दिवसांपासून ही तरुणी लॉजवर राहत असल्याची ही माहिती खबऱ्यांनी त्यांना दिली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या आदेशाने शेगाव पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे.

या कडक लाॅकडाऊन दरम्यानही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आणि अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शेगावच्या या घटनेने परिसरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Post a Comment

0 Comments