बार्शी! श्री भगवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने "वड" लागवडीचा उपक्रम...


बार्शी/प्रतिनिधी;

 बार्शी तालुक्यातील श्री भगवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्वर्गीय नवनाथ ( आण्णा ) मिरगणे यांच्या जयंतीनिमित्त नवीन माध्यमिक प्रशाला बेलगाव या ठिकाणी वडांच्या झाडांची लागवड करून त्यांना आदरांजली देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे माजी सहसंचालक श्री प्रकाश पाटील यांच्या हस्ते अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले. 

वटवृक्ष हे देशी वृक्ष असून, पर्यावरण संवर्धनासाठी आणि पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी खूप महत्वपूर्ण असल्याने लागवडीसाठी या झाडाची निवड केल्याचे यावेळी सांगण्यात आले. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनही काळाची गरज असून येणाऱ्या वर्षभरामध्ये आण्णांच्या कार्याची साक्ष जिवंत ठेवण्यासाठी, अण्णांच्या वया एवढे मोठा वृक्ष लागवड करून हरितक्रांती निर्माण करण्याचे ध्येय अण्णांचे चिरंजीव शंकर मिरगणे यांनी व्यक्त केले. 

कोरोना महामारी च्या संदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करत अगदी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी गावचे सरपंच परशुराम कांबळे, मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे,मुख्याध्यापक सुहास पाटील व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments