मुंबई:
आपल्याच खात्यातील महिला सहकारी अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून सहायक पोलीस निरीक्षकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संदीप शिवाजी पिसे असे त्याचे नाव असून महिला पाेलीस उपनिरीक्षकाने या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर डोंगरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिसे कफ परेड पोलीस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत असून गेल्या ८ वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केल्याने महिला पाेलीस उपनिरीक्षकाने आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पाेलिसांत दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते अधिक चाैकशी करत आहेत. दोघेही १०८ क्रमांकाच्या पीएसआय तुकडीचे अधिकारी आहेत. २०१३ मध्ये दोघे डोंगरी पोलीस ठाण्यात नियुक्तीला होते. त्यावेळी पिसे व तिचे प्रेमसंबंध जुळून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केला. त्याबाबतची माहिती या महिला पाेलीस उपनिरीक्षकाला मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली.
1 Comments
नोकरी लागताना लिहुन घेयला पाहीजे यांच्या कडुन पोलीस खात्यात लफडी करनार नाही म्हणुन😡😡😡😡
ReplyDelete