"सुट्टी मंजूर झाली नाही, पोलिस स्टेशनमध्येच झाली महिला कॉन्स्टेबलची हळद"


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. अशातच एका महिला पोलीस काॅन्स्टेबलच्या हळदी समारंभानंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे. संबंधित महिलेची हळदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलेने तिच्या अशा स्थितीमध्ये देखील सुट्टी न घेतल्याने सगळ्यांनाच तिचा अभिमान वाटत आहे.

राजस्थानमधील डुंगरपूर येथील पोलिस ठाण्यातील ही घटना आहे. महिला पोलिस काॅन्स्टेबलचं नाव आशा असं आहे. आशा या लवकरच लग्न गाठ बांधणार आहेत. आशा यांचं लग्न ३० एप्रिलला असून त्यांच्या लग्नाचे अनेक पुर्व कार्यक्रम चालू आहेत. अशात काल आशा यांचा हळदी समारंभ होता. मात्र कोरोनाच्या ड्यूटीमुळे त्यांना सुट्टी मिळाली नाही. या कारणामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील सगळ्यांनी मिळून आशाला अत्यंत छान सप्राईज दिलं आणि आशाचा हळदीचा कार्यक्रम पोलीस ठाण्यात आयोजित केला.

 हळदीचा कार्यक्रम पोलीस ठाण्यात पार पाडण्यात आला, असं इनचार्ज दिलीप दान चरण यांनी सांगितलं. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी आशा यांना सुट्टी मिळाली आणि त्या घरी गेल्या. दरम्यान, हळदी समारंभानंतर आता आशा यांचं ३० एप्रिलला लग्न आहे. यादरम्यान त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच लग्न मागील वर्षीच होणार होतं. मात्र कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे ते पुढं ढकलण्यात आलं.

Post a Comment

0 Comments