बार्शीतील जिजाऊ ब्रिगेडच्या माता-भगिनी सरसावल्या पेशंट व नातेवाईकांना अल्पोपहार देण्यासाठी


बार्शी/प्रतिनिधी;

जगभरात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयानक परिस्थिती दाखवणारी आली  त्यामध्ये अनेक नागरिक  ऑक्सीजन साठी तर बेड साठी बिकट परिस्थिती आली गेल्या वर्षी आलेल्या लाटेमध्ये महाराष्ट्रातील देशातील सर्वच नागरिकांनी एकमेकांना मदत केली अनेकांनी अन्नछत्रालय उभा केली परंतु यावर्षी क्वचित अन्नछत्र लय चालू दिसले. परंतु रुग्णांची नातेवाईकांची नाश्त्याची गैरसोय होऊ नये  म्हणून बार्शी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या शैलजा गीते स्मिता देशपांडे परिवर्तन संघटनेच्या सुगंधा आगवणे व रफिक पठाण यांच्या कडून मोफत नाश्त्याची सोय करण्यात आली.

यामध्ये दररोज जगदाळे मामा हॉस्पिटल येथील पेशंट व नातेवाईक यांना जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मोफत नाश्ता दिला जातो, बोलताना शैलजा गीते म्हणल्या, गोष्टी करत असताना आम्हाला बार्शीतील इतर संघटनांनी मदतीचा हात द्यावा अशी जिजाऊ ब्रिगेड च्या शैलजा गीते यांनी आव्हान देखील केले आहेत तरी यांचा कार्यास सर्व बार्शीकर यांनी सलाम केला आहे.

Post a Comment

0 Comments