मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय बापाला होता. त्यामुळे पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून बापाने बापाने त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्याच ट्रकखाली स्वतः आत्महत्या केली. पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता हा धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.
मोठ्या मुलीचे कुणाशीतरी प्रेमसंबंध सुरू आहेत आणि ती व्हॉट्सअपद्वारे त्या मुलाशी संवाद साधते, असा संशय बापाला आला होता. या संशयावरून निर्दयी बापाने अख्खंच्या आख्खं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाची बाब म्हणजे याच कुटुंबाती लहान मुलगी आणि त्याची पत्नी यामधून बचावले आहेत.
भरत भराटे असं निर्दयी बापाचं नाव आहे. त्याने १८ वर्षाच्या नंदिनी आणि १४ वर्षाच्या वैष्णवी या दोन मुलींची हत्या केली आहे. हत्या करण्यापूर्वी त्याने एक चिट्टी देखील लिहून ठेवली आहे. त्यात मुलीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करत अख्खंच्या कुटुंब संपवत असल्याचं नमूद केलेलं आहे.
दरम्यान, तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन्ही मुलींचे मृतदेह शेजारी शेजारी तर बापाचा मृतदेह तिथून सात ते आठ फुटांवर होता. मुलींच्या आईनं घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला तेव्हा पोलिसांना घटनाक्रमाचा उलगडा झाला. घटनास्थळावर पोलिसांना मुलीच्या बापानं लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयावरुन संपूर्ण कुटुंबाला संपवायला निघालेल्या या बापाच्या कृत्यानं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
0 Comments