बीड जिल्ह्यातील शिरूर कासार हा सर्वात मागास तालुका म्हणून ओळखला जातो. शिरूरपासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिवंडी शेतातील वस्तीवर राहणारे सय्यद शब्बीर हे गेल्या २० वर्षांपासून गोशाळा चालवतात.
आपल्या दावनीला असणारी जनावरे सकाळी सोडून डोंगरात जगवायची हा दिनक्रम असणाऱ्या शब्बीर मामू यांनी त्यासाठी कसलेही अनुदान कुणाकडे कधीच मगितले नाही. जी मदत मिळेल त्यावर समाधान मानत मुक्या जनावरांची शेण झाडलोट ते २० वर्षांपासून करीत आले आहेत. आपल्या कामाचे कसलीही मार्केटिंग न करता काम प्रामाणिकपणे करणारे शब्बीर मामू यांनी आज दुष्काळी स्थितीत ८५ गाई संभाळल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच कुटुंब या गोसेवत कार्यरत आहे.
गेली पन्नास वर्षे निस्वार्थपणे गोसेवा करणाऱ्या बीड मधील सय्यद शब्बीर (६५ ) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आला.(सन २०१९) नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.
0 Comments