बार्शी टेक्सटाइल मिल ३१ मार्चपासून सुरू होणार; उस्मानाबाद-बार्शी लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आ.राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश!


रणजीत पाटील/परंडा प्रतिनिधी:बार्शी टेक्सटाइल मिल ३१ मार्चपासून सुरू होणार; उस्मानाबाद-बार्शी लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आ.राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश!

 देशासह राज्यातील कोरोना कालावधीच्या लॉकडाऊन पासून, मागील एक वर्षापासून बंद असलेली बार्शी टेक्सटाईल मिल 31 मार्च 2021 पासून सुरु होणार आहे. मिल सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना व आदेश शुक्रवार दिनांक 12 मार्च 2021 रोजी प्राप्त झाले असल्याची माहिती खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
 
संपूर्ण देशातील लॉकडाउनच्या प्रक्रियेनंतर काही काळाने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली होती. या अनलॉकच्या प्रक्रियेपासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा.स्मृतीजी इराणी यांच्या कडे दि.15 सप्टेंबर 2020 रोजी OBPR-MP/Osmanabad/6126/2020 पत्राद्वारे तसेच दि.23 ऑक्टोबर 2020 रोजी OBPR-MP/Osmanabad/6368/2020 पत्रव्यवहार करून मिल सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा चालू होता. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर व बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा.स्मृतीजी इराणी, मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडे पत्रव्यवहार करून मिल सुरू करण्यासंदर्भात सतत पाठपुरावा चालू होता. आज या पाठपुराव्याला यश आले असून कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

कामगारांचा प्रश्न लक्षात घेता मा. खासदार ओमराजे निंबाळकर व आ. राजेंद्र राऊत यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याने या ही मिल सुरू होत आहे. यामुळे सर्व कामगारांमध्ये आमदार व खासदार यांचे कौतुक केले जात आहे. याबद्दल बार्शी टेक्सटाईल मिलचे जनरल मॅनेजर व मिल कामगारांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राजाभाऊ राऊत यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments