गगनबावड्यातील कर्जबाजारी तरुणाने केली बोरगावच्या महिलेची हत्या


कळे/प्रतिनिधी: 

गगनबावडा तालुक्यातील कर्जबाजारी झालेल्या प्रकाश सदाशिव कुंभार (वय ३५ रा. असंडोली ता. गगनबावडा) या तरुणाने बोरगाव (ता. पन्हाळा) येथील एका महिलेची हत्या करून तिचे दागिने लंपास केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश कुंभार या तरुणाने ६ मार्चरोजी छबुताई केरबा पाटील (वय ५८ रा. बोरगाव ता.पन्हाळा) या महिलेची अज्ञातस्थळी हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी तिचा मृतदेह मार्गेवाडी येथील जाळीचा मळा येथील नदीकाठी झाडाच्या बुंध्याला बांधून ठेवला.

दरम्यान, ६ मार्च रोजी संबंधित महिला गायब  झाल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी   पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित आरोपी मृत महिलेच्या घरी वारंवार येत होता. या संशयावरून त्याला १४ मार्चरोजी रात्री ९ वाजता ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.   

करवीरचे पोलीस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक फडतरे, पोलीस अंमलदार आत्माराम शिंदे, रविंद्र कांबळे, अंकुश शेलार पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments