कुस्ती टिकवायची असेल तर डोपिंगला हद्दपार करा : पै.मतीन शेख


'डोपिंग मुक्त कुस्ती' अभियानला प्रारंभ : कुस्ती हेच जीवनचा पुढाकार

बाचणी (कोल्हापूर) : कुस्ती सारख्या आपल्या परंपरागत आणि रांगड्या खेळाला डोपिंगचा लागलेला डंक धोकादायक आहे.पैलवानांना जडत चाललेली डोपिंगची सवय ही पिढी बरबाद करेल.छोट्या तसेच युवा मल्लांना स्टेरॉइडच्या विषापासून दूर ठेवायचे असेल तर पालक व वस्ताद मंडळींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.जर या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर मल्लांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल.असे प्रतिपादन कुस्ती अभ्यासक पै.मतीन शेख यांनी केले.ते शिव छत्रपती कुस्ती संकुल,बाचणी (ता.कागल) येथे 'डोपिंग मुक्त कुस्ती अभियान' प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करत होते.

श्री.शेख म्हणाले,राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला,मल्लांना बळ दिलं.ती कुस्ती टिकवण्याचे काम सर्व कुस्तीप्रेमींचे आहे.'कुस्ती हेच जीवन' संघटनेच्या माध्यमातून डोपिंग विरोधी जगजागृती मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे.तरच पैलवानकी टिकुन राहिल.यावेळी शिव छत्रपती कुस्ती हे नविन  संकुल उभारण्यासाठी कुस्ती हेच जीवनचे अध्यक्ष पै.अनिल पाटील यांनी विशेष आर्थिक साहाय्य केल्याबद्दल त्यांचा वस्ताद तानाजी गवसे यांच्या वतीने सत्कार करण्यात केला.

यावेळी अशोक सातूशे माजी सरपंच (साके), पै.पांडुरंग महाडेश्वर सरपंच, पै.सुभाष वाडकर माजी सरपंच, कुलदीप खोत, रजनीकांत चिदगे, जयंवत भोसले, भरत भाट, शिवाजी संकपाळ, बाळु सुतार, मयूर पाटील, स्वागत पाटील,प्रकाश कांबळे,संकुलाचे मल्ल तसेच वस्ताद मंडळी व पालक उपस्थित होते.

मल्लांनी घेतली शपथ....

युवा मल्लांनी डोपिंग पासून लांब रहावे. राज्यात जागृतीची मोहिम सुरु व्हावी यासाठी 'तांबड्या मातीची आन घेऊया,आपली कुस्ती डोपिंगमुक्त करूया' अशी प्रतिज्ञा यावेळी संकुलातील सर्व मल्लांनी घेतली व मोहिमेस चांगला प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments