राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टि्वटकरून
पंढरपूर/प्रतिनिधी:
मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर होताच राज्यमंञी दत्तात्रेय भारणे यांनी समर्थकांना गुलाल उधळायला तयार राहण्याचे आवाहन केले आहे.
दत्तात्रेय भारणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की,आदरणीय पवार साहेबांनी आज उमेदवार नव्हे, तर "विजेता" घोषित केला आहे. स्व.भारत नानांवर ज्यांनी अमाप प्रेम केलं, त्या मायबाप जनतेचे आशीर्वाद व विठू माऊलींची कृपा भगीरथ भारतनाना भालकेंच्या पाठीशी आहेत. गुलाल उधळायला तयार राहा, आपला विजय निश्चित आहे, असे भारणे यांनी म्हटले आहे.
0 Comments