...फक्त पाचशे रुपयांसाठी पोलिसांमध्ये ठाण्यातच तुंबळ हाणामारी


 सध्या सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असतानाच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सोयगाव पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीतून ठाण्यातच तुंबळ हाणामारी झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे.

सूत्रांनि दिलेली अधिक माहिती अशी की, सोयगाव ठाण्यातील चौधरी व शिंदे नावाच्या दोन कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून सोयगाव बायपास रस्त्यावर कपडे काढून तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर त्यांची समजूत काढत सहकाऱ्याने पोलिस ठाण्यात आणले. मात्र, पोलिस ठाण्यात पुन्हा या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चौधरी नावाचा कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांना बनोटी दुरक्षेत्राचे बिट जमादार दिलीप तडवी यांनी उपचारासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Post a Comment

0 Comments