माढा तालुक्यात कोरोनामुळे गरोदर महिलेचा मृत्यू


माढा/प्रतिनिधी: 

माढा तालुक्यातील तांबवे गावातील १९ वर्षीय गरोदर महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अगोदरच तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली असतानाच गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सदरची महिला ही सिव्हील रुग्णालयात उपचार घेत होती. प्रसृती पुर्वीच त्या महिलेच्या बाळाचा ही मृत्यु झाल्याची बाब सोनो ग्राफितून समोर आली होतो. त्यानंतर प्रसृती अगोदरच महिलेचा मृत्यु झाला. महिला आजारी असल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

उपचार घेऊन घरी परतल्यावर त्या महिलेच्या सासूचा कोरोना अहवाल बाधित आला होता. अगोदरचगरोदर असताना अन् पुन्हा अधिक त्रास वाढु लागल्याने या महिलेला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. गरोदर असल्याने महिलेची सोनोग्राफी काढण्यात आली. त्यात बाळाचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. बाळ मृत्यू झाल्याने महिलेची शस्रक्रिया देखील केली जाणार होती. मात्र, त्या अगोदरच बाळा पाठोपाठ आईचा ही मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments