कोंढेज येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न


जेऊर/प्रतिनिधी:

कोंढेज ता करमाळा येथे स्वराज्याचे धाकले धनी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३२ व्या स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. राजमाता मॉसाहेब जिजाऊ, तसेच  स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वराज्याच्या धाकल्या धन्यास म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे हरिभाऊ लोंढे, प्रशांत लोंढे, मिठू लोंढे, सुरेश इंगोले, समाधान लोंढे, रामभाऊ आदलिंग, बापू आदलिंग, राहुल इंगोले, धनंजय सुदाम लोंढे, रमेश लोंढे, महादेव गुंडगिरे, अमोल जगताप, शंकर साळुंखे, पप्पू चांगण, कैलास साबळे, श्रीहरी आरणे, नितीन साळुंखे, रेवा करे, पिंटू माने, वैभव लोंढे, तानाजी लोंढे, आकाश लोंढे, दत्तात्रय लोंढे, धनंजय लोंढे, भैरवनाथ लोंढे, वैभव दादा लोंढे, रोहित लोंढे, विनोद शिवणे, अशोक पवार, प्रमोद शिवणे, श्रीराम सव्वाशे, अशोक राऊत, अक्षय उंबरे, सोमनाथ उंबरे, दत्ता आरणे, शंकर राऊत, बापू तोरमल, भाऊ माने, आदित्य इंगोले, बबलू उंबरे, व गावातील सर्वच प्रतिष्ठित मंडळी आणि तरुण वर्गाने कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करत, संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी संभाजी महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments