बार्शी/प्रतिनिधी:
दि २६ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास एका खाजगी यार्डातून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मानद पशुकल्याण अधिकारी धन्यकुमार पटवा यांना मिळाली कर्तव्यदक्ष DYSP श्री अभिजित धाराशिवकर यांना दिली श्री धारशिवकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहता तात्काळ तालूका पोलीस स्टेशनचे API श्री शिवाजीराव जायपत्रे यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश केले.
श्री जायपत्रे यांनी तात्काळ बंदोबस्त उपलब्ध करून सदर वाहने MH-13 CU7-508 व इतर एक वाहन जामगाव बायपास येथे ताब्यात घेत एकूण २ वाहनातून कोंबून दाटीवाटीने भरलेल्या तब्बल २२ देशी बैलांची सुटका केली.या वेळी समाधान महादेव कांबळे (वय ३० वर्षे रा.वालचंड ता.बाशी ) शुभम रामेश्वर शिंदे यांचे टॅम्पोमध्ये मदतीकरिता नजीर मुजफ्फर कुरेशी वय ४५ वर्षे रा .मंगळवार पेठ बार्शी एकूण तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस अमलदार राहुल मोतीराम बोंदर वय -२६ वर्षे , नेमणुक बार्शी तालुका पोलीस ठाणे यांनी समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब दिला.
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा१९६०प्राण्यांचे परिवहन नियम १९७८,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे सर्व बैल पालन पोषणासाठीं अलीपुर येथील गोशाळेत दाखल केले आहेत
पोलीस अमलदार राहुल मोतीराम बोंदर वय -२६ वर्षे , नेमणुक बार्शी तालुका पोलीस ठाणे यांनी समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब दिला. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा१९६०प्राण्यांचे परिवहन नियम १९७८,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
0 Comments