बार्शी ! नागोबाचीवाडी येथे पुढारपण करण्याच्या कारणावरून दोन गटात भांडण ;१८ जणांविरोधी परस्पर विरोधी गुन्हा दाखलबार्शी/प्रतिनिधी:

 नागोबाची वाडी येथे पुढारपण करण्याच्या कारणावरून तसेच भांडण सोडविण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणावरून दोन्ही गटातील १८ जणांविरुध्द परस्परविरोधी बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यात बापु सुरेश चोबे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले, की स्वतः फिर्यादी व फिर्यादीचे मामा अजित बारंगुळे, विष्णु बारंगुळे ग्रामपंचायतीसमोर दि. २८ फेब्रुवारी रोजी सायं साडेसहा वा. गप्पा मारत बसले असता तेथे संजीवनी बारंगुळे, सतीश बारंगुळे, देविदास गायकवाड ,बापु गायकवाड, भिवा गायकवाड,विलास गायकवाड, पंकज भोसले, प्रशांत भोसले, रोहन भोसले, विवेक भोसले, लक्ष्मण भोसले, तुळशीराम भोसले सर्व ( रा. नागोबाची वाडी, ता. बार्शी ) असे १२ जण बेकायदा जमाव जमून तुम्ही लय पुढारपण करता काय असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली .
(Advertise)

व फिर्यादिच्या घरावर दगडफेक करत खिडक्याच्या काचा फोडून पाच हजार रुपयाचे नुकसान केले व जाताना तुम्ही आमचा नाद केला तर तुम्हाला जीवच मारतो अशी धमकी देऊन शिविगाळ करत निघुन गेले यावरून असे १२ संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.या गुन्ह्याचा अधिक तपास पोना.केकान करीत आहेत 

तर  फिर्यादी संजीवनी बारंगुळे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले दि२८ रोजी रात्री ९.३० वा फिर्यादीचा भाचा रोहन भोसले व देविदास गायकवाड हे ग्रामपंचायत समोरून किराणा बाजार घेऊन येत असताना त्या दोघांना रामा पंढरे याने दारू पिऊन शिवीगाळ सुरू केली यावेळी फिर्यादी भांडण सोडवण्यास गेली असता रामा पंढरे , अजित बारंगुळे, विष्णू बारंगुळे, रवी बारंगुळे, शंकर बारंगुळे, ज्ञानेश्वर हाके( सर्व रा. नागोबाचीवाडी ता.बार्शी ) या सहा जणांनी फिर्यादीला तु भांडण सोडविण्यासाठी आली काय लंगडे असे म्हणत अपंगात्वर टिका करुन धक्काबुक्की केली.पाच वर्ष आमची सत्ता आमचं तुम्ही काही एक वाकड करू शकत नाही. तु मधी- मधी आली तर तुझा हात पायच मोडतो यावरून झालेल्या भांडणावरून गुन्हात ६ जणांविरुध्द बार्शी तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला या गुन्हाचा अधिक तपास पोहेकॉ. भोसले करीत आहेत


 

Post a Comment

0 Comments