करोनाबाधितांच्या संसर्गात घट झाल्याने WHO ने केलं भारताचं कौतुक


भारतात कोविड-१९ च्या संसर्गाच्या प्रमाणात घट झाल्याने जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) या महामारीच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले आहे. भारताने कोविड-१९वर नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी करुन दाखवली, असं संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ए. गेबरेसस यांनी म्हटलं आहे.

“या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्यास करोनाच्या विषाणूवर आपण सहज मात करु शकतो, हे आपल्याला भारताच्या कामगिरीवरुन दिसतं. या प्रयत्नांमध्ये लसही समाविष्ट झाल्याने आता अधिक चांगले परिणाम घडून येतील अशी आपण आशा करतो,’ असंही WHO च्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

(Advertise)

दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितलं की, देशात सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव घटत असल्याचे दिसते आहे. दररोजच्या आकडेवारीत घट होत आहे, जी सप्टेंबर २०२०च्या मध्यावर सर्वात उच्च पातळीवर पोहोचली होती.

भारतात करोनाबाधितांची संख्या पोहोचली १.०८ कोटींच्यावर :

भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने १.०८ कोटींचा टप्पा पार केला असून गेल्या चोवीस तासात १२,४०८ नवे लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आजवर एकूण १,०४,९६,३०८ करोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. भारतानं १४ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु केली असून ३ फेब्रुवारीपर्यंत ४१,३८,९१८ कोविड योद्ध्यांनी ही लस घेतली आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांचा समावेश असणार असून येत्या मार्चपासून या मोहिमेला सुरुवात होईल.

Post a Comment

0 Comments