अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी एलआयसीबाबत महत्वाची घोषणा केली आहे. एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी आणि आयडीबीआय मधील निर्गुंतवणुकीमधून सरकार ९० हजार कोटींचा फंड उभा करण्याच्या विचारात आहे. तर इतर काही कंपन्यांबाबत देखील निर्गुंतवणूक करण्याचा विचार सरकार करत आहे. सध्या एलआयसीकडे ४०० अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे. मोदी सरकार हळूहळू खाजगीकरनाची कास धरत आहे.
0 Comments