✍️ सुनील दळवी ( वाकीघोलकर )
मुळ गाव फये ता. भुदरगड जि. कोल्हापूर पाच बंगला, रेल्वे फाटक, शाहूपुरी जवळ चहाची गाडी चालवणारा आणि तानाजी गडदे ला CA पदा पर्यंत पोचवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महादेव गडदेची प्रेरणादायी कहाणी..
स्वतः १० वी पर्यंत शिक्षण फये, ता. भुदरगड मध्ये झालं, घरची परिस्थिती बेताची असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुरवातीला मिळेल ते काम करत स्वतःची चहाची गाडी शाहूपुरी, पाच बंगला परिसरात सुरु केली. मोठा भाऊ तानाजीला शिक्षणाची आवड असल्यामुळे त्याने १० पर्यंतचे शिक्षण नागोजीराव पाटणकर शाळा, बी.कॉम कॉमर्स कॉलेज, एम. कॉम शिवाजी विद्यापीठात पूर्ण केलं या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत घराची संपूर्ण जबाबदारी लहान भाऊ महादेव गडदेने सांभाळली आज जरी यशाचा गड सर केला असला तरी पाठीराखा म्हणून लहान भाऊ महादेव चहाचा व्यवसाय सांभाळत त्याला लागेल ती शैक्षणिक मदत करत होता, महादेव स्वतः परिस्थिती मुळे शैक्षणिक उंची गाठू शकला नाही पण सख्या भावाची शैक्षणिक आवड पाहून त्याला योग्य पदावर घेऊन जाण्याचं मोठं काम महादेव ने केलं, घरची परिस्थिती, ग्रामीण जीवन, या सर्व पार्शवभूमीना छेद देत स्वतःशी प्रामाणिक राहून, लहान भाऊ, आपल्यासाठी करत असलेली धडपड पाहून अनेक वेळा उंबरठ्यावर आलेलं अपयश तानाजीन संयम राखत, स्वतःच्या अभ्यासाशी प्रामाणिक राहत मिळवलं
आज C.A तानाजी झाला पण स्वतःकरत असलेल्या प्रामाणिक कष्टाला आणि महादेवच्या घामाला आज न्याय दिला, तानाजीला संकपाळ कुलकर्णी &असोसिएट्स चार्टड अकाउंट व CA निलेश भालकर , मित्रपरिवार यांच मोलाचं मार्गदर्शन लाभलं.
0 Comments