माजी आमदारासह आठ जणांची हत्या करणाऱ्या भोंदू बाबाला गुजरातमध्ये अटक



समाजात भोंदू बाबांची कमतरता नाही. असाच एक भोंदू बाबा ज्याची कहाणी चित्रपटाची कहाणी वाटावी अशी आहे. भोंदू बाबा एका माजी आमदारांसह आठ जणांनाची हत्या करून गुजरातमध्ये महाराज म्हणून वावरणाऱ्या कथित महाराजाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

हरयाणातील माजी आमदारासह आठ जणांची हत्या करणाऱ्या मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला गुजरातमधील अमरेलीमध्ये अटक करण्यात आली आहे. संजीव कुमार असं या भोंदू बाबाचं नाव आहे. कुमारनं त्याची बायको सोनियाच्या मदतीनं सासरे आणि माजी आमदार रेलू राम पुनिया यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांची २००१ साली हत्या केली होती. या प्रकरणात त्याला सुरुवातीला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर २००४ साली या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं होतं. कुमारची २०१८ साली पॅरोलवर सुटका झाली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.

कुमारनं जेलमधून फरार झाल्यानंतर गुजरातमधील राजूला तालुक्यात असलेल्या आनंदयोग आश्रमाचा आश्रय घेतला होता. या आश्रमात कुमारनं 'आनंदगिरी महाराज' हे नाव धारण केलं होतं. तेथील भाविक संत समजून त्याची देखील पूजा करत असत.कुमार दरवर्षी आश्रमात कृषी संमेलन भरवत असे. मागील वर्षी झालेल्या कृषी संमेलनात त्यानं चक्क गुजरातच्या राज्यपालांना देखील निमंत्रण दिलं होतं. कुमार गुजरातमध्ये लपून बसल्याचा संशय हरयाणा पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांचा गुजरातमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये तपास सुरू होता.

Post a Comment

0 Comments