वाशिम: दिवसेंदिवस होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे दर वाढत असल्यामुळे महिलांना चुलीवर स्वंयपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने होत असलेली गॅसदरवाढ कमी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चूल पेटवून आंदोलन करण्यात आले.
महिलांना गोवऱ्या भेट देण्यात आल्या-
यावेळी केंद्र सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देत निषेध नोंदवला. यावेळी महिलांना गोवऱ्या भेट देण्यात आल्या. जर केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी नाही केली. तर प्रत्येक पेट्रोल पंपावरील मोदींच्या बॅनरसमोर आंदोलन करण्याचा, इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. हे आंदोलन अकोला नाक्यावर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो महिला व पदाधिकारी उपस्थित होते.
या काळातही मोदी सरकारने अबकारी कर मोठ्याप्रमाणात वाढवला. या वाढीव कराची झळ आता सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र, याचा फायदा जनतेला थेट स्वरूपात न देता मोदी सरकार मोठ्या उद्योजकांना याचा फायदा करून देत आहे. सामान्य जनतेच्या खिशाला आधार देण्याविषयी महागाईचा फटका मोदी सरकार जनतेला देत आहे, असा आरोप आंदोलनकर्ते करीत आहेत.
वीजबिलावरून भाजपा तर पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून शिवसेना आक्रमक-
दिवसेंदिवस महागाईने कळस घाठला आहे. या महागाईच्या चटक्याने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना वाढीव वीजबिल दिल्याने भाजपा राज्यात आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे वाढते पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाहनधारकांना न परवडणारे असल्याने शिवसेनादेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतेय.
0 Comments