लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद ! हे .. आहे कारण


२६ जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्यालाल किल्यावरील ट्रॅक्टर रॅलीनंतर चांगलाच चर्चेत आला आहे. अशात आता या लाल किल्ल्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद केला गेला आहे.

(Advertise)

मध्य दिल्लीच्या डीएमनं याबाबतचे आदेश दिले आहेत. दिल्ली आपत्ती प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशामध्ये सांगितलं, की लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरातील बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता हे ठिकाण सामान्य जनता आणि पर्यकांसाठी बंद केलं गेलं आहे.

याआधी लाल किल्ल्याच्या परिसरात १४ कावळे आणि ४ बदकांचा मृत्यू झाला होता. यानंतर तपासणीदरम्यान त्यांना बर्ड फ्लू झाल्याचं आढळून आलं होतं.

Post a Comment

0 Comments