महाआघाडी सरकारवर टीका करणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. “राधाकृष्ण विखे पाटीलजी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायलादेखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे, तुमचाच संघर्ष चाललाय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच.” असा टोला अनिल देशमुख यांनी ट्विटवरून दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनात बसणार असे सांगत अण्णा हजारे यांनी भाजप नेत्यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित केले. पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील हे फडणवीस आणि अण्णा हजारे यांच्यामागे उभे असल्याचे दिसले. याचा फोटोही व्हायरल झाला होता आणि त्याचाच उल्लेख करत अनिल देशमुख यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.
0 Comments