राज्यातील भाजप नेत्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज राखवी- आमदार रोहित पवार



देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामागील गणित मांडत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ झाल्यामुळे राज्य सरकारवर टीका करत असलेल्या भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

२०१४ मध्ये भाजपने सत्ता हातात घेतली तेंव्हा पेट्रोलवर ९.५ रु कर आकारला जात होता. आज हाच कर ३२.९० रु वर गेला. म्हणजेच त्यात तब्बल३५०% नी वाढ झाली. डिझेलबाबत बघितलं तर २०१४ मध्ये केंद्र सरकार ३.५६  रु कर आकारात होतं, आज त्यात सुमारे ९००% वाढ झाली असून आज तो ३१.८० रु पर्यंत पोहचला, असल्याचं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(Advertise)

दरम्यान, आपल्या पक्षाच्या केंद्र सरकारला कर कमी करायला लावण्याऐवजी उलट राज्य सरकारने कर कमी करावेत अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जातेय याला काय म्हणावं? अशी मागणी करणाऱ्यांना किमान जनाची नाही तर मनाची तरी वाटायला हवी, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments