कोल्हापूर/प्रतिनिधी:
सातारा- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संभाजी नगर आगार कोल्हापूर विभाग येथील चालक श्री बाळासाहेब हिंदुराव कांबळे यांनी आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी महाबळेश्वर कोल्हापूर या मार्गावर आपल्या एसटी बस वर कर्तव्य बजावत असताना बसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावली, व दोन्ही बाजूला भगवे झेंडे लावले व सातारा बसस्थानकात आले .
नंतर रेश्मा गाडेकर आगार व्यवस्थापक सातारा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तसेच आज एसटी महामंडळाचे वतीने प्रवाशी दिन साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती व प्रवाशी दिन या दोन्ही उत्सवाच्या निमित्ताने बाळासाहेब कांबळे यांनी महाबळेश्वर ते कोल्हापूर प्रवास करणा-या प्रवाशांना पेढे वाटून नेहमी आपल्या एसटी महामंडळाचे बस ने प्रवास करुन आम्हाला आपल्या सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी, व एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी संभाजी नगर आगाराचे वाहक राहुल सरनाईक ,चालक जनक जाधव सातारा आगार,यांचे सहकार्य लाभले हि बस मधील जयंती प्रवाशांसाठी कुतुहल निर्माण करणारी होती, असे मतही अनेक प्रवाशांनी व्यक्त केले चालक बाळासाहेब कांबळे हे नेहमीचं विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचे कार्य करतात २०२० साली त्यांनी बस मध्ये जयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी ची १००० पुस्तकांचे मोफत वाटप केले होते, ते बस मध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी , वर्तमानपत्रे, फिरते वाचनालय, मोबाईल चार्जिंग सुविधा, कचरा पेटी, औषधे, सॅनेटायजर, आदी सुविधा उपलब्ध करून देतात त्यांना आजवर महाराष्ट्र राज्यातील २७ सामाजिक सेवा संस्थानी पुरस्कार देऊन गौरविले असुन ०९ फेब्रुवारी२०२१ या दिवशी मुंबई येथे कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी गुणवंत कामगार पुरस्कार २०१५ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदान केला आहे.
0 Comments