शरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द!


 पुण्यातील वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार होते. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय.

राज्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केलं होतं. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सूचनेनुसार हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वशाटोत्सवाच्या आयोजकांनी सांगितलं आहे. राज्यात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments