'आमदार मामासाहेब चषक ' बक्षीस वितरण आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते



कुर्डुवाडी/प्रतिनिधी:

कुर्डुवाडी येथे दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राज क्रिकेट क्लब,भोसरे आयोजित 'आमदार मामासाहेब चषक ' क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.यावेळी प्रथम पारितोषिक राज क्रिकेट क्लब भोसरे,द्वितीय पारितोषिक शिवक्रांती क्रिकेट क्लब, करमाळा,तृतीय पारितोषिक रिधोरे क्रिकेट क्लब यांना वितरीत करण्यात आले. आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.

(Advertise)

यावेळी कुर्डूवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष समीर मुलाणी, उपनगराध्यक्ष हरीदास बागल, जि.प.सदस्य आप्पासाहेब उबाळे,ता.पं.सदस्य सुरेश बागल,नगरसेवक आनंद टोणपे,संभाजी सातव,पै.अस्लम काझी, शिवसेनेचे सचिन बागल,चौभेपिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे,बोरगांवचे सरपंच विनय ननवरे,बारलोणीचे सरपंच संजय लोंढे,चिंचगांवचे सरपंच सुभाष उबाळे,भोसरे गावचे ग्रा.पं.सदस्य गणेश बागल,सुधीर बागल, हर्षल बागल व क्रिकेटप्रेमी युवक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments