शासन नियुक्त करमाळा तालुक्यातील करण्यात येणाऱ्या समित्या मध्ये पारदर्शकता येण्यासाठी सर्व पक्षीय व सामाजिक कार्यकर्ते सभासद असावेत - संजय घोलप मनसे तालुका अध्यक्ष


करमाळा :

तालुक्यातील शासनाच्या वतीने नेमण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, विद्युतमहामंडळ समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, दारू अवैध उत्पादन समिती, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य समिती, पर्यावरण समिती, आत्मअंतर्गत तालुका शेतकरी सल्ला समिती, सह तालुका स्तरीय  इतर समित्यांमध्ये तहसीलदार यांनी सर्व राजकीय  पक्षांना व सामाजिक कार्यकर्ते यांना  विस्वासात घेऊन संधी दिली जावी.

 त्यामुळे जनसामान्यांपर्यत योजना पोहोचण्यास मदत होऊन पारदर्शकता येईल व मनमानी कारभार होणार नाही .अशी मागणी मनसे चे तालुकाध्यक्ष मा. संजय (बापू) घोलप यांनी केली आहे. या मागणीच्या प्रति मा पालकमंत्री  मा दत्तात्रय भरणे मामा,जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर ,आमदार मा.संजयमामा शिंदे ,मा.समीर माने तहसीलदार करमाळा,आदींना पाठवल्या आहेत तरी लवकर विचार होऊन निर्णय होईल अशी  अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments