राजकीय मैदानात हरवता येणं शक्य नाही म्हणून.... - स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक


धनंजय मुंडे यांच्या जन्मगावी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना कल्पना शर्मा प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य केलं. जोपर्यंत मायबाप जनतेच्या मनात विश्वास आहे म्हणून कुणी कितीही काही केलं तरी तुमच्या आशीर्वादाने काहीच होणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.

(Advertise)

अनेक कठीण काळातून मी गेलो आहे. असा संघर्ष माझ्या नशिबी का आला, भगवंताला हात जोडून आभार मानतो. तू संकटं आणली म्हणून मी इथपर्यंत आलो, असं मुंडे म्हणाले.मी मंत्री झाल्यावर संकट थांबतील असं वाटलं होतं पण राजकीय मैदानात हरवता येणं शक्य नाही त्या वेळेस माझ्या सोबत झालं ते होतंय, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments