अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी नराधमास दहा वर्षाचा सश्रम कारावास


एका ठिकाणी राहणाऱ्या नराधम बापानेच आपल्या लहान मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी न्यायालयाने नराधमास दोषी ठरवत आरोपीला दहा हजाराचा दंड आणि दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी ठोठावबली.

विशेष सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी पॉक्सो न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितले, पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी बापासोबत राहत होती. नराधमाने ३० ऑगस्ट, २०१८, ४ सप्टेंबर, २०१८ ला मुलीवर अत्याचार केला. तिला त्रास होत असल्याने ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्यावेळी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्याने डॉक्टरांनी तिला पालकांना आणण्यास सांगितले. त्यानंतर मुलीने थेट पोलीस ठाण्यात वडिलाच्या विरोधात तक्रार दिली. सरकारी वकील म्हात्रे यांनी न्यायालयासमोर पाच साक्षीदार आणि डीएनए चाचणीच्या सहायाने घडलेला प्रकार सिद्ध केला.

सरकारी वकील व तपास यंत्रणांनी सादर केलेले साक्षी आणि पुरावे वैद्यकीय आहवाल, असे सबळ पुरावे ग्राह्य धरत न्यायाधीश कविता शिरभाते यांनी नराधमास दोषी ठरवत १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Post a Comment

0 Comments