पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. “जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर भाजपाला नक्कीच मतदान करा. मात्र, तुम्ही ममता बॅनर्जीला पराभूत करु शकत नाही, कारण, ती एकटी नाही. तिला लोकांचा पाठिंबा आहे.
जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपाला येथे येऊ देणार नाही”, असं थेट आव्हान ममता बनर्जी यांनी भाजपला दिलं आहे. कोलकातामधील एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपवर जोरदार टीका केली.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देत आहे. पण तृणमूल काँग्रेसचं सरकार प्रत्येक शेतकऱ्याला ५ हजार रुपये देत आहे. तसंच मोफत पीक विम्याचीही व्यवस्था केल्याचं ममता यांनी सांगितलं.
0 Comments