शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या ट्वीटवरून सचिन तेंडुलकरसह अन्य सेलिब्रिटींना सल्ला देणाऱ्या शरद पवारांवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.
सचिनला शेतीमधलं काही कळत नाही ते ठीक आहे. पण कधी क्रिकेट खेळले होते? कधी बॅटिंग केली होती? कधी बॉलिंग केली होती? तरीही ते अध्यक्ष झाले ना,’ असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना टोला लगावला.
त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून सध्या सुरू घडामोडींवर सडेतोड मतं मांडली. जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भारतातील बऱ्याच सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी तिच्या विरोधात ट्वीट केले होते. यात सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पवारांनी सेलिब्रिटींना इतर क्षेत्रांबद्दल जपून विधानं करण्याचा सल्ला दिला होता. याविषयी विचारलं असता सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.
0 Comments