भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही हे दुर्दैव - अजित पवार



दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही हे दुर्दैव आहे म्हणत अजित पवारांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

पवार म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेत आल आहे. आताही शेतकऱ्यांच्याच बळावर आहे. पण तरीही शेतकरी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही हे दुर्दैव आहे. जगातल्या कोणत्याच देशात असं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं नाही. इतकी भयानक स्थिती भारतात आहे.

(Advertise)

तसेच जगभरातील अनेक सेलेब्रिटीनी शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठींब्यामुळे देशात त्यांना ट्रोल केलं गेलं. त्यावरही अजित पवार यांनी खडे बोल सुनावले. पवार म्हणाले, परदेशातल्या सेलीब्रेटीनं ट्विट केलं म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करता..?इतके दिवस तुम्ही का बोलला नाही असा सवाल देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

Post a Comment

0 Comments