विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी राजीनामा दिला आहे. मात्र विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. नाना पटोलेंच्या जागी काँग्रेसच्या नेत्याची निवड होणार असल्याने नेमकं कोणाला विधानसभा अध्यक्षपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून सुरेश वारपूडकर, अमीन पटेल आणि आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी हा नाव चर्चेत आहेत. मात्र यामधील केसी पाडवी हे नाव आघाडीवर असल्याची माहिती समजत आहे.
केसी पाडवी हे अक्कलकुव्या मतदारसंघातील आमदार आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदाचा कारभार सांभाळला आहे.
0 Comments