येथील कारागृहाचे अधिक्षक अंबादास पाटील यांना निलंबित करण्यात आले.अर्णव गोस्वामी यांना जेलमधे मोबाईल पुरवणे व्ही.आय.पी.ट्रीटमेंट देणे यांना चांगलेच महागात पडले. खातेनिहाय चौकशीनंतर पाटील यांच्यावर कारवाई झाली.
तपासात त्यांनी अर्णवला मोबाईल पुरविल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी यापुर्वीच दोन कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई झाली. रायगड पोलीसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख,नीतेश सारडा यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथुन अटक केली.
मे.अलिबाग न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावली होती. अर्णवसह नितेश आणि फिरोज यांना अलिबाग नगर परिषद शाळा क्रमांक १ मधे ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अलिबाग जिल्हा कारागृहाचे पोलीस तैनात करण्यात आले होते. ६ नोव्हेंबर रोजी अर्णव यांना जेल पोलीसांनी मोबाईल पुरविल्याचे प्रकरण बाहेर आले.
0 Comments