मल्लिकार्जुन खरगे होणार राज्यसभेचे विरोधी पक्षनेते


 राज्यसभेमध्ये विरोध पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते म्हणून सभापतींकडे काॅंग्रेसकडून पाठवण्यात आली आहे. 

वेणुगोपाल यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, "काॅंग्रेसने राज्यसभेचे सभापती वैंकेय्या नायडू यांना सांगितले की, गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्तीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते म्हणून पाठविण्यात आले आहे. त्यामुळे खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होणार आहेत", अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली आहे. 

(Advertise)

राज्यसभेचे विरोधी पक्षाचे उपनेते असणारे आनंद शर्मा यांना विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी शर्मा यांची इच्छा होती. मात्र, काॅंग्रेस पक्षांतर्गत उठवलेल्या आवाजात शर्मादेखील पुढे होते, त्यामुळे काॅंग्रेसने आनंद शर्माच्या नावावर जास्त उत्साह दाखविला नाही. असं असलं तरी मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींच्या जवळचे नेते मानले जाते. 

Post a Comment

0 Comments