फँड्री, सैराट आणि नाळच्या भरघोस यशानंतर नागराज मंजुळे दिगदर्शीत झुंड चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत झुंड या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसाशिवाय यासाठी कोणताच चांगला दिवस असू शकत नाही..झुंड हा चित्रपट १८ जूनला प्रदर्शित होणार आहे.
सैराट, फँड्रीसारखे तगडे मराठी सिनेमे दिल्यानंतर मराळमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हिंदीत उडी घेतली आणि ‘झुंड’ या हिंदी सिनेमाची घोषणा झाली. अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची या चित्रपटात वर्णी लागली. चित्रपट बनून तयार झाला. पण लॉकडाऊनमुळे अडकला. लॉकडाऊन उठला, पण यादरम्यान ‘झुंड’ कायद्याच्या कचाट्यात अडकला. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न नागराज यांच्या चाहत्यांना पडला होता.
0 Comments