आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द


बार्शी/प्रतिनिधी:

१५ ऑक्टोबर २०२० रोजी बार्शी शहर व तालुक्यात पावसाची अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीत शहर व तालुक्याचे  भरपूर प्रमाणात नुकसान झाले व जिवितहानीही झाली. या अतिवृष्टीमुळे बार्शी शहरातील पाटील चाळ येथील अजय उर्फ दादा चौधरी हे तुळजापूर रोड येथील ओढ्यात वाहून गेले होते. ते वाहून गेल्यानंतर प्रशासनामार्फत त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्या काळात यश आले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
 
(Advertise)

या घटनेनंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबास धीर देण्याचा प्रयत्न केला होता. आमदार राजेंद्र राऊत यांनी वेळोवेळी मृत दादा चौधरी यांचा तपास करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. तसेच हा विषय त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही उपस्थित केला होता.
 
या घटनेनंतर मागील आठवड्यात त्यांचा मृत सांगाडा सापडला व त्यांची ओळख पटली. यामुळे आज शासनाच्या वतीने स्व. अजय चौधरी यांच्या पत्नी श्रीमती स्वाती अजय चौधरी यांना ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश आमदार राजेंद्र राऊत व तहसीलदार प्रदीप शेलार साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. वेळी नगरसेवक रोहित लाकाळ, बाबासाहेब मांगडे, काकासाहेब फपाळ, विशाल मांगडे, अजित मांगडे, मदन देशमुख, रामभाऊ म्हस्के, विश्वास शेंडगे, पप्पू माने, संजय गव्हाणे, नारायण बनसोडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments