वेल्लोर येथील ३५ वर्षीय वकिल स्नेहा स्नेहा पार्थीबराजा विना जात - विना धर्म प्रमाणपत्र असणाऱ्या पहिल्या भारतीय नागरिक ठरल्या आहेत. विना जात आणि धर्म एक भारतीय म्हणून वेगळी ओळख असावी यासाठी त्या हक्काची लढाई लढत होत्या. तब्बल ९ वर्ष त्या ही लढाई लढत होत्या. स्नेहा पार्थीबराजा, 'विना जात विना धर्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय नागरिक आहेत.
भारतीय म्हणून तिची ओळख स्वयंपूर्ण असल्याचे नमूद करून तिच्या जन्म प्रमाणपत्रामध्ये आणि शाळा आणि महाविद्यालयीन काळात तिच्या कुटुंबियांनी जात आणि धर्माचा उल्लेख रिकामा सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळेच असंख्य ठिकाणी स्नेहाचे हे प्रमाणपत्र अवैद्य ठरवण्यात आले होते. अखेर २०१७ साली स्नेहाने तिचा शेवटचा अर्ज दाखल करतांना मला कुठले हि आरक्षण अथवा सरकरी अनुदान नको आहेत त्यामुळे मला माझे प्रमाणपत्र विना जात विना धर्म असणे वैध असावेत असे वाटते, असे सबंधित अधिकार्यांना सांगितले होते.
अखेर तीरुपात्तुर येथील सब कलेक्टर बी. प्रियंका पंकाजम यांनी तिला विना धर्म विना जात ओळख प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रमाणपत्रामुळे इतर कुणाची हि संधी अथवा कुठले हि नुकसान होत नसल्याने हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे देखील त्यांनी नमूद केले. स्नेहाने हे दिलेल्या या ऐतिहासिक लढाईचे समाज मध्यमातून कौतुक होत असून. यामुळे जात आणि धर्म यांच्यावर माणसात होणारा भेद भाव थांबवण्याची प्रेरणा देशाला मिळणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
0 Comments