चंदगड येथे वैचारिक शिवजयंती साजरीआज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने चंदगड येथे वैचारिक शिवजयंती साजरी झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी कांबळे यांनी केले.

शिवाजी राजे हे खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे आणि रयतेचे राजे होते.शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू न देणारे छत्रपती शिवाजी राजे आज असते तर शेतकर्‍यांची  चाललेली चेष्टा आणि त्यांचे हाल कधीच खपवून घेतले नसते.असे उद्गार प्रा.ए.डी.कांबळे यांनी काढले.
आजच्या या वैचारिक शिवजयंतीला प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

खरं तर चंदगड तालुक्यात घराघरात शिवाजी महाराज पोचवणारे प्रा.ए.डी.कांबळे यांनी सर्वसमावेशक चळवळ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रबोधनाला सुरुवात केली.
महापुरुषांचा खरा आणि नेमका इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची कायम तळमळ असते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध जीवनपैलूंवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सौ.नेत्रदीपा कांबळे या होत्या.

वैचारिक चळवळ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेल्या या वैचारिक शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या.

यावेळी प्रमोद कांबळे(चंदगड),मयूर मोरे(औरंगाबाद),रवी कांबळे(दाटे),अनंत कांबळे(कोरज),अरुण कांबळे(हिंडगाव),विजय कांबळे(कोरज),विक्रम कांबळे(दाटे), आणि चंदगड तालुका परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

रवी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments