शेलगाव (क)च्या सरपंच पदी अशोक काटुळे तर उपसरपंचपदी कविता वीर यांची निवड


करमाळा/प्रतिनिधी:

शेलगाव (क)च्या सरपंचपदी अण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा माजी मुख्याध्यापक अशोक काटुळे यांची शेलगावाच्या सरपंचपदी निवड झाली आहे, तर उपसरपंच पदी कविता सचिन वीर यांची निवड झाली आहे या निवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सात सदस्याच्या ग्रामपंचायतीमध्ये तिसर्‍या आघाडीचे सातही उमेदवार निवडून आले होते यामधून अशोक काटूळे यांची सरपंच पदी तर कविता वीर यांची उपसरपंच पदी निवड झाली, इतर सदस्यांची नावे लक्ष्मण विश्वनाथ ढावरे, धर्मराज गोपीनाथ शिंदे, रेश्मा राहुल कुकडे, यमुना आत्माराम वीर, सुलोचना आप्पा पाटील हि आहेत.

(Advertise)

सरपंच निवडीवेळी रामचंद्र काटुळे (माजी मार्केट कमिटी संचालक), श्रीधर पाटील, सचिन पाटील, सुभाष पायघन, भगवान मोहिते, गणेश माने,आत्माराम वीर, विकास वीर,अजित काटुळे यांच्या सह गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments