आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने सरकार चालतोय, विरोधकांनी लावालावी करू नये - राष्ट्रवादी काँग्रेस


आमचा कारभार उत्तम सुरू आहे. आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करत आहोत. त्यामुळे विरोधकांनी लावालावी करू नये, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील हे अमरावतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली.

शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने वारंवार पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर गेले होते, असं जयंत पाटील म्हणाले. मात्र हे आंदोलन बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments