....तेव्हा उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे; बच्चू कडूंनी ठोकला दावा


राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे, अशी मागणी केली आहे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला हे. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि ३ उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत ४ उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस ५ होईल, असं गणित मंत्री कडू यांनी मांडलं आहे. ते वर्धा येथे स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

(Advertise)

काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाला सत्ता पालटण्याची स्वप्न पडत आहेत तर महाविकास आघाडीतील काँग्रेस उपमुख्यमंत्री पदासाठी आटापिटा करत आहे. त्यातच आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. ठाकरेंच्या या दाव्यावर बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला दिलं जावं अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments