केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.
खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, लोकांच्या हातात रोख रक्कम पैसे राहतील ही गोष्ट आता विसरा. मोदी सरकारने आपली मालमत्ता आपल्या उन्मत्त भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात देण्याची योजना आखली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
0 Comments