टेंभुर्णी येथे एका तरुणाकडून तीन किलो गांजा जप्त


टेंभुर्णी/प्रतिनिधी:

टेंभुर्णी शहरामध्ये गांजाची तस्करी करताना एक जणांना अटक करण्यात आली आहे. गौतम आजिनाथ भोसले (वय ३३) असे गांजा तस्करी करणाऱ्या तरुणांचे नाव आहे. त्याच्याकडून टेंभुर्णी पोलिसांनी त्याच्याकडून २० हजार रुपयांच्या गांजासह दुचाकी व मोबाईल असा एकूण ८० हजार रुपयेच्या हस्तगत केला आहे. त्याला न्यायालयाकडून १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
(Advertise)

पोलिसांची पेट्रोलिंग दरम्यान कारवाई

टेंभुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी व्ही काशीद हे रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी शहरामध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी संशयास्पदरीत्या एक दुचाकीस्वारास जाताना पाहिले व थांबून त्याची चौकशी केली असता. त्या तरुणाकडे गाडीच्या डिकीत एकवीस हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी पीव्ही काशीद यांनी त्या तरुणाला अटक केली.

(Advertise)

टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

टेंभुर्णी पोलीस ठाण्यांमध्ये त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गौतम आजिनाथ भोसले राहणार वेणेगाव तालुका माढा असे सांगितले, यांनी दिलेल्या जबाबावरून हा गांजा कर विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समजले एन टी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. व त्या तरुणाकडून गांजा एक दुचाकी दहा हजार रुपयांचा मोबाईल असा ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.

Post a Comment

0 Comments