नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकासआघाडी सरकार मध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार का? असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या. मात्र आता खुद्द नाना पटोले यांनी राज्यात उपमुख्यमंत्री पद मागणार नाही असे सांगितले आहे.
राज्यात उपमुख्यमंत्री पद मागणार नाही. पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाणे हे सरकार चालेल, असे पटोले यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा वारंवार मोदींना पत्रव्यवहार केला आहे. जे तीन कायदे आणले आहेत ते चुकीचे आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी उद्धवस्त होईल. आता पंतप्रधान कोणत्या अधिकारानं शेतकऱ्यांना आंदोलन थांबवायला सांगत आहेत
0 Comments