ब्रेकिंग: उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळली; १५० जण बेपत्ता



 उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातील ऋषिगंगा प्रोजेक्टवर हिमकडा कोसळल्यानंतर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित जवळपास १०० ते १५० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

तातडीने मदतकार्य सुरू-

 हिमकडा कोसळल्यानंतर चमोली जिल्ह्यात आलेल्या पुरात १००-१५० जणांना फटका बसल्याची शक्यता असल्याचं उत्तराखंडाचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी म्हटलंय. उत्तराखंडातील जोशीमठाजवळ हिमकडा कोसळल्यानंतर मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. १०७० किंवा ९५५७४४४४८६ या क्रमांकावर नागरिक मदत मिळवण्यासाठी संपर्क साधू शकतात.

(Advertise)

 प्रशासनाकडून चमोली, देवप्रयाग, कर्णप्रयाग आणि श्रीनगरमध्ये लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

 आयटीबीपीच्या दोन टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या तीन टीमला देहरादूनहून घटनास्थळी धाडण्यात आलंय. तसंच आणखी ३ टीम्स सायंकाळपर्यंत हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं घटनास्थळी पोहचवल्या जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments