निवडणुकीचा जाहीरनामा होता, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र होते - बाळासाहेब थोरात


आज मोदी सरकारच्या पर्वातील दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सडकून टिका केली आहे. मोदी सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्याच राज्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची नवी पद्धत समोर आलीय. ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या राज्यात काही द्यायचेच नाही हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे या अर्थसंकल्पातून समोर आलेय. या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनामा बनवला आहे असा घणाघात थोरात यांनी केला.

अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकल्यावर हा निवडणुकीचा जाहीरनामा होता, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र होते, हाच प्रश्न पडला आहे, असे म्हणत थोरतांनी मोदी सरकारला चिमटे काढले आहेत.

(Advertise)

देशाच्या इतिहासात अर्थसंकल्पातून पायाभूत विकासाच्या प्रकल्पांची घोषणा व्हायची. सत्तर वर्षांत यातून अनेक प्रकल्प उभे राहिले. आजच्या अर्थसंकल्पातून मात्र हे सगळे प्रकल्प विकून आत्मनिर्भर भारताच्या पोकळ घोषणा अर्थमंत्र्यांनी दिल्यात. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी उभारलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणा-या कंपन्या विकण्याचा सपाटाच मोदी सरकारने लावलाय. मै देश नही बिकने दुंगा, असे म्हणणारे मोदी खोटे बोलत होते. यावर स्वत: अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणातून शिक्कामोर्तब केले आहे अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments