वॉशिंग्टनंची एकाकी झुंज; भारत पहिल्या डावात ३३७ वर गारद; फॉलोऑनबाबत इंग्लंडने घेतला ‘हा’ निर्णय



भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३३७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर  यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं, परंतु आर अश्विन  वगळता तळाच्या अन्य फलंदाजांची त्यांना साथ मिळाली नाही. 

(Advertise)

त्यामुळे भारताला पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करावी लागली. आणि इंग्लंडला भारताला फॉलोऑन देण्याची संधी मिळाली. मात्र, इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा इंग्लंडचा निर्णय घेतला आहे.

(Advertise)

तत्पूर्वी, इंग्लंडनं पहिल्या डावात उभा केलेला ५७८ धावांचा डोंगर सर करताना टीम इंडियाची दमछाक झाली. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल हे आघाडीचे फलंदाज फार काही करू न शकल्यानंतर टीम इंडियाचं काही खरं नव्हतं. पण, रिषभ पंत  आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. पुजारा दुदैवी रित्या माघारी परतला, पण रिषभची फटकेबाजी सुरूच होती. रिषभचं शतक पुन्हा हुकलं आणि तो ९१ धावांवर माघारी परतला.

Post a Comment

0 Comments