धक्कादायक! खंडणी देण्यास नकार दिला म्हणून पालघरमध्ये नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले



एका नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करून जिंवत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत नौदल अधिकाऱ्याचे नाव सूरज कुमार आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दुबे यांचे चेन्नई विमानतळावरून अपहरण करण्यात आले आणि १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. दुबे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर कारमधून पाच फेब्रुवारीला महाराष्ट्र गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या जंगलात आणण्यात आले. तिथे त्यांना बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी त्यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.

(Advertise)

५ फेब्रुवारीला दुबे यांना जळलेल्या अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिलं आणि पोलिसांनी माहिती दिली. स्थानिक रुग्णालयात दुबे यांना दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर मुंबईच्या आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणीच त्यांनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments